कोल्हापुरात गोल बुब्बुळाच्या पालीची नोंद

कोल्हापुरात गोल बुब्बुळाच्या पालीची नोंद

09422

कोल्हापुरात आढळली
आकर्षक गोल
बुब्बुळाची पाल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः केरळ-तामीळनाडू येथून होणाऱ्या लाकडांच्या वाहतुकीसोबत येथील टिंबर मार्केट परिसरात ''निमास्पीस ग्रासीलीस'' या गोल बुबुळाच्या पालीचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. या पालीच्या आढळ क्षेत्राची व्याप्ती आणि पुनर्वर्णन करणारा शोधनिबंध ''झूटॅक्सा'' या अंतराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित झाला आहे. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल तसेच शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्राचे प्रा. सुनिल गायकवाड आणि ‘बीएनएचएस''चे सौनक पाल यांचा सहभाग आहे.
''निमास्पीस ग्रासीलीस'' या गोल बुबुळाच्या पालीचा शोध १८७० मधे रिचर्ड बेडोम या ब्रिटीश संशोधकाने लावला. अंगावरील आकर्षक रंग आणि छोट्या आकारांवरुन या पाली लक्ष वेधून घेतात. संशोधनामधे ही पाल तिचा नैसर्गिक अधिवास सोडून इतरत्र प्रसारीत झाल्याची पहिलीच नोंद टिंबर मार्केट परिसरातून करण्यात आली. ही पाल पहिल्यांदा विवेक कुबेर यांना टिंबर मार्केट परिसरात निदर्शनास आली. त्यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे पुढे या पालीचा अधिकचा अभ्यास करण्यात आला. मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक अधिवासाच्या बाहेर होणाऱ्या प्राण्यांच्या प्रसाराचा त्या अधिवासावर आणि त्या प्राण्यांवर काय परीणाम होतो, हे तपासण्यासाठी दिर्घकालीन संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रा. सुनिल गायकवाड यांनी सांगितले. ''निमास्पीस ग्रासीलीस'' ही पाल छोटा आकार आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे वेगळी ओळखता येते. या पालींचे नर माद्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. तसेच या पाली दिनचर असून, दिवसा आपले भक्ष्य पकडण्यासाठी बाहेर पडतात, असे अक्षय खांडेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com