पाच हजार फूड पॅकेटस गरजूंपर्यंत

पाच हजार फूड पॅकेटस गरजूंपर्यंत

पाच हजार फूट पॅकेटस
पोचली गरजू लोकांपर्यंत
प्रशांत मंडलिक यांनी केले वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः राज्यभरात शासनातर्फे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम चालू आहे. तेरा जूनला शहरातही हा कार्यक्रम झाला. या वेळी कार्यक्रमानंतर शिल्लक राहिलेली पाच हजारांवर फूड पॅकेटस गरजूपर्यंत पोचवल्याची माहिती मंगळवार पेठेतील प्रशांत मंडलिक यांनी दिली.
कार्यक्रमासाठी जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील तीस ते पस्तीस हजार नागरिक येणार असे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाकडून हाजारो फूड पॅकेट तयार करण्यात आली. मात्र, पाच हजारावर पॅकेटस शिल्लक राहिली. केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनूसार जिल्ह्यात शिल्लक अन्न जमा करून घेण्याचा परवाना मंडलिक यांच्याकडे आहे. त्यांना संबंधित ठेकेदाराने संपर्क करून शिल्लक अन्नाची माहिती दिली. त्यानंतर मंडलिक यांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन रात्री नऊ ते अकरा या वेळेत या पाकिटांचे वितरण केले. संभाजीनगर, सुधाकर जोशीनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, यादवनगर, सदर बाजार, विचारे माळ आदी ठिकाणी ही पाकिटे त्यांनी वितरित केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com