''टाक''च्या अध्यक्षपदी बळीराम वराडे

''टाक''च्या अध्यक्षपदी बळीराम वराडे

09448
बळीराम वराडे
09449
रवी पोतदार
09450
अमित चौकुले

ट्रॅव्हल एजंट असोसिएशनच्या
अध्यक्षपदी बळीराम वराडे  
कोल्हापूर, ता. १४ : ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची (टाक) कार्यकारिणीची जाहीर झाली असून बळीराम वराडे यांची अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड झाली. ही कार्यकारिणी ३१ मार्च २०२५ पर्यंत कार्यरत राहिल. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी रवी पोतदार, सचिवपदी अमित चौकुले, खजिनदारपदी उमेश पवार यांची निवड झाली आहे. अन्य कार्यकारिणीमध्ये विनोद कांबोज, संजय गांधी, सचिन सावंत यांचा समावेश आहे.
सर्व ट्रॅव्हल एजन्सीला संघटित करून त्यांच्या समस्या सोडवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ‘टाक’ची स्थापना करण्यात आली. ही संस्था सर्व गव्हर्न्मेंट समिती सभासद म्हणून चेम्बर्स ऑफ कॉमर्स, जिल्हा पर्यटन समिती, कोल्हापूर, एअरपोर्ट अॅडव्हायजरी, रेल्वे समिती या संस्थांवर सभासद म्हणून काम करत आहे. भविष्यात टाकच्या सभासदांना ‘टाई’चे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याचे वराडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com