लेफ्टनंट कदम यांचा शिवराजतर्फे सत्कार

लेफ्टनंट कदम यांचा शिवराजतर्फे सत्कार

Published on

GAD151.JPG
09560
गडहिंग्लज : शिवराजतर्फे लेफ्टनंट निखिल कदम यांचा सत्कार डॉ. एस. एम. कदम यांच्याहस्ते झाला. यावेळी डॉ. अनिल कुराडे, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
लेफ्टनंट कदम यांचा
शिवराजतर्फे सत्कार
गडहिंग्लज, ता. १६ : हंदेवाडी (ता. आजरा) येथील निखिल कदम यांची एनडीए परीक्षेद्वारे लेफ्टनंटपदी निवड झाली. त्यानिमित्त येथील शिवराज महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्याहस्ते सत्कार झाला.
श्री. कदम म्हणाले, ‘तरुणांना भारतीय सैन्यदलात ऑफिसर होण्यासाठी खूप संधी आहेत. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाही आर्मीमध्ये अधिकारी पदावर काम करण्याची संधी आहे. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न आवश्यक आहेत. आर्मीतील नोकरी प्रतिष्ठा देणारी आहे. देशसेवेच्या संधीतून खरा सन्मान मिळतो. आर्मीमध्ये संधी मिळवण्यासाठी आवश्यक परीक्षांची माहिती त्यांनी दिली. डॉ. अनिल कुराडे म्हणाले, ‘कदम यांनी एन.डी.ए. सारखी खडतर परीक्षा देऊन कर्तृत्व सिद्ध केले आहे. आर्मीसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये निखील यांना सेवा करण्याची संधी मिळाली आहे. हे खरोखरच अभिमानस्पद आहे.’ प्राचार्य कदम यांनी मार्गदर्शन केले. सुभेदार श्री कन्हैया, हवालदार प्रदीपकुमार, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बिनादेवी कुराडे, प्रा. विश्वजित कुराडे, निखील कदम यांचे आई-वडील व नातेवाईक आदी उपस्थित होते. डॉ. आनंदा कुंभार यांनी स्वागत केले. प्रा. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com