शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडली अर्ध्यावर
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडली अर्ध्यावर
सक्षम अधिकारी नसल्याचे कारण; संकेश्वर-बांदा महामार्गासाठी पुन्हा बैठकीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या पावसाळ्यातील कामाच्या नियोजनाची माहिती मिळावी, यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदारांनी राष्ट्रीय महामार्ग, कंपनीचे अधिकारी आणि ठेकदार यांच्यासोबत बैठक बोलावली होती. बैठकीला महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने झालेल्या चर्चेवर नियोजन होणार नाही असे सांगत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक अर्ध्यावर सोडली. पुन्हा बैठक बोलवण्याची मागणी केली. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई अध्यक्षस्थानी होते.
संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या कामाचे पावसाळ्यातील नियोजन सांगा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार समीर माने यांनी बैठक बोलावली होती. आजरा तालुक्यात संकेश्वर ते बांदा या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आजरा ते किटवडेपर्यंतचा रस्ता उखडून टाकला आहे. पावसाळा तोंडावर आहे. पाऊस सुरू झाल्यास या मार्गावर अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचे नियोजन सर्वांना समजावे याबाबत बैठक होती. बैठकीला प्रोजेक्टचे उपव्यवस्थापक हरी ओम, महामार्ग शाखा अभियंता अनिल पाटील उपस्थित होते.
मारुती डोंगरे म्हणाले, ‘गवसे येथील मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून महामार्ग जातो. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी महामार्ग ओलांडून शिक्षण कसे घ्यावे? त्यासाठी स्काय वॉक उभारावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता घालून अधिकारी धाकधपटशाही करीत आहेत.’ आजरा चंदगड शिवसेनेचे संपर्क प्रमुख व आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, ‘येथे कोणीही सक्षम अधिकारी समाधानकारक उत्तर देण्यासाठी उपस्थित नाही. तहसीलदारही अनुपस्थित होते. त्यामुळे चर्चा निष्फळ होणार आहे. सक्षम अधिकारी व महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावावी.’ याला उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी दुजोरा दिला आणि पदाधिकारी बैठकीतून निघून गेले. गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, भुदरगड तालुका प्रमुख प्रकाश पाटील, दिनेश कांबळे, सुनील डोंगरे, राजकुमार भोगण, ओमकार माद्याळकर, गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहिते, मानसिंग देसाई, अनंत मोरजकर, प्रकाश हरमळकर उपस्थित होते.
-------------
शिवाजीनगरमधून जाणाऱ्या महामार्गाबद्दल स्पष्टता द्या
येथील शिवाजीनगरमधून महामार्ग जात असून तो किती रुंदीचा होणार, याबाबत अजूनही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टता द्यावी. नागरिक गोंधळात असल्याचे अनंत मोरजकर यांनी सांगितले. महामार्गाचे शाखा अभियंता श्री. पाटील म्हणाले, की पावसाळ्यानंतर रस्ता होणार आहे. याबाबत माहिती देऊ असे सांगत वेळ मारून नेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

