सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
ajr162.jpg....
09719
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागण्याबाबत निवेदन देताना दत्ताभाऊ काकडे. यावेळी राजू पोतनीस आदी उपस्थित होते.
-----------------
सरपंच परिषदेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस यांची माहिती; ग्रामविकास विभागाची विशेष बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १६ ः मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ग्रामिण भागातील व ग्रामपंचायतीच्या विविध समस्यांकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले व मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामीण भागातील समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकता दर्शवली, अशी माहीती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस यांनी दिली.
नवी मुंबईमध्ये सरपंच भवन उभारावे. सी एस सी कंपनीकडून कॉम्प्युटर ऑपरेटरबाबतचे अधिकार ग्रामपंचायतीला द्यावेत. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष उभारावा. ग्रामपंचायतीला अकस्मात निधी म्हणून दहा लाखांची मदत करावी. सरपंच यांना एसटी मोफत करावी, घरकुलसाठी शहर व खेड्यात वेगळी रक्कम ही तफावत दूर करावी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सरपंचांना मतदानाचा अधिकार असावा, सरपंचांना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे. सरपंचांना ओळखपत्रद्वारे मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीमध्ये सरपंच प्रतिनिधी घेण्यात यावा. शासकीय समित्यांवर सरपंच परिषदेचा प्रतिनिधी घेण्यात यावा यासह विविध मागण्या केल्या.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुरेश धस, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. विकास जाधव, प्रदेश राज्य कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदी बैठकीस उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

