सोमवरी

सोमवरी

Published on

भारतीय मजदूर संघ अंतर्गत
लेबर २० परिषद सोमवारी
कोल्हापूर, ता. १६ : भारतीय मजदूर संघ जी-२० अंतर्गत लेबर २० परिषद सोमवारी (ता. १९) होणार आहे. येथील शाहू स्मारक भवनात दुपारी तीनला परिषद होईल. सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन होणार आहे. भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे प्रमुख वक्ते आहेत. ते कामगारांची सामाजिक सुरक्षा, महिलांच्या कामाचे भविष्य व कौशल्य वाढ या विषयांवर मार्गदर्शन करतील. परिसंवादात भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री मोहनराव येनुरे, अखिल भारतीय असंघटित क्षेत्राचे प्रभारी जयवंतराव देशपांडे, अखिल भारतीय औद्योगिक प्रभारी अण्णा धुमाळ सहभागी होतील.
जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या संघटनेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचे अध्यक्ष असून, या अंतर्गत कामगारांची आघाडी स्थापन करण्यात आली. जगभरातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याची संधी प्रथमच भारताला मिळाली आहे. त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी लेबर २० च्या परिषदेच्या मसुद्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
या परिषदेस संघाचे प्रदेश चिटणीस उमेश महाडिक, जिल्हाध्यक्ष उमेश विश्‍वास, प्रदेश उपाध्यक्षा अनुजा धरणगावकर, मुकुंद जोशी, एस. एन. पाटील, सचिव प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com