...तर कंत्राटदार, ग्रामपंचायतींवर गुन्हे
...तर कंत्राटदार, ग्रामपंचायतींवर गुन्हे
जलजीवन मिशन योजना; जलव्यवस्थापन समिती सभेत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेत काही ग्रामपंचायती पदाधिकारी तर काही ठिकाणी कंत्राटदारांकडून अडवणूक सुरू आहे. गावाला पाणी देण्यात अडथळा आणणाऱ्या पदाधिकारी व कंत्राटदारांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हो दाखल करावेत, असा निर्णय आज झालेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभा घेण्यात आली.
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेचे काम गतीने सुरू आहे. गेल्या वर्षभरात गावांचे आराखडे मंजूर करणे, त्यांना तांत्रिक, प्रशासकीय मान्यता घेणे, समित्यांची तसेच सर्वसाधारण सभेची मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. राज्यस्तरावरुन दर मंगळवारी या योजनांचा आढावाही होत असतो. तरीही काही गावामधील पाणी योजनांत अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी शाखा अभियंता यांनी आजच्या जलव्यवस्थापत समिती बैठकीत केल्या. ज्या गावात सत्ता बदल झाला आहे, त्याठिकाणी असे प्रकार वाढले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
गावातील प्रत्येक व्यक्तीला शुद्ध, स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना घेण्यात आली आहे. मात्र, या योजनेत असे कोणी अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणत असल्याचे गुन्हे दाखल करा, अशी सूचना चव्हाण यांनी केली. या वेळी तालुकानिहाय योजनांचा आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी काम सुरू नाही, त्याठिकाणी शाखा अभियंत्यांनी भेटी देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
चौकट
कंत्राटदार काळ्या यादीत
गावांना पाणी योजना मंजूर झाल्या तरी काही ठिकाणी कंत्राटदारांनी कामे सुरू केलेली नाहीत. काम एकाच्या नावावर तर प्रत्यक्ष करणारा दुसराच, असा काहीसा प्रकार घडत आहे. त्यामुळे ज्या कंत्राटदाराच्या नावे काम आहे, जे काम अद्यापही सुरू नाही, अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाणार आहे. तसेच त्याच्याकडील इतर कामांवरही कारवाई केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

