गाळ उपसा

गाळ उपसा

Published on

09859
कोल्हापूर : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील टॅंकमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.


निम्म्या शहरात रविवारी
कमी दाबाने पाणीपुरवठा
जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता सुरू; ३५ हजार घनफूट गाळ उठाव
कोल्हापूर, ता. १६ : पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून आज एका टाकीमधील १७ हजार २४६ घनफूट गाळ काढला आहे. कळंबा जलशुद्धीकरण केंद्रातीलही १९ हजार २०० घनफूट गाळ काढला आहे. उद्याही (ता. १७) उर्वरित काम केले जाणार आहे. त्यामुळे रविवारी निम्म्या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
कळंबा तलावावरून कळंबा जलशुद्धीकरण केंद्रास सायफन पद्धतीने अशुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्याचे शुद्धीकरण कळंबा फिल्टर हाऊस येथे होते. त्यावरून ए, बी वॉर्डमधील शहाजी वसाहत परिसर, मंगळवार पेठ परिसर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, म्हाडा कॉलनी परिसर आदी परिसरास दररोज पाणीपुरवठा केला जातो. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामधून शिंगणापूर योजनेतील अशुद्ध पाणीपुरवठा होतो. पुईखडी येथे जलशुद्धीकरण असून ए, बी वॉर्ड व ई वॉर्डपैकी काही भागास म्हणजे निम्म्या शहरास या केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढणे आवश्यक असते. त्यानुसार गतवर्षीप्रमाणे गाळ काढण्यास सुरुवात केली असून कळंबा जलशुद्धीकरण केंद्रातील दोन टँकमधील अंदाजे १९ हजार २०० घनफूट गाळ काढला आहे. पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील एका टॅंकमधील अंदाजे १७ हजार २४६ घनफूट गाळ काढला आहे. शनिवारी (ता. १७) दुसऱ्या टॅंकमधील गाळ काढला जाणार आहे. या कामामुळे रविवारी निम्म्या शहरात अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. काही भागात पाणी येण्याची शक्यता कमी आहे.
कळंबा केंद्रातील सफाईचे पाणी निर्माण चौकाकडील रस्त्यावर बाहेर आले. शहरात पाणीटंचाई असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठी गळती असल्याचा अनेकांना गैरसमज झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com