समरजीतसिंह घाटगे पत्रक

समरजीतसिंह घाटगे पत्रक

Published on

09852
कोल्हापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात कागल विधानसभा मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या नियोजनासाठीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे. शेजारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, सुशांत बनसोडे.


‘शासन आपल्या दारी’चे पहिले शिबिर रविवारी
---
समरजितसिंह घाटगे; उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आयोजन
कोल्हापूर, ता. १६ ः राज्य शासन व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पातळीवर उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवारी (ता. २५) होणार आहे. राज्यात सर्वप्रथम होत असलेला हा कार्यक्रम यशस्वी करून आदर्श निर्माण करूया, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. उत्तूर जिल्हा परिषद अंतर्गत होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कागल, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
घाटगे म्हणाले, ‘‘शहरी भागातील नागरिकांमध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जागरूकता आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक जिल्हा व तालुका पातळीवर जाऊन या योजनेचा लाभ घेताना मागे राहतात. म्हणूनच जिल्हा परिषद मतदारसंघाप्रमाणे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.’’
जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, की जिल्हा पातळीवरील कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनानंतर आता जिल्हा परिषद पातळीवरील कार्यक्रम यशस्वी करून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, असे काम करा.
प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, सुशांत बनसोडे, बाबासाहेब वाघमोडे, कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, आजरा तहसीलदार समीर माने, गडहिंग्लजचे निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, गडहिंग्लजचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वरूप खारगे, गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर, ‘शाहू’चे संचालक सचिन मगदूम उपस्थित होते.

चौकट
‘स्वतःला कलेक्टर समजून काम करा’
जिल्हाधिकारी डॉ. रेखावार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःला कलेक्टर समजा. तुमच्या मनात असलेल्या संकल्पना यशस्वीपणे राबवा. वंचित लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ देऊन एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही, इतके आदर्श काम करा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com