आंदोलनकार्त्यांना ताब्यात-सुटका

आंदोलनकार्त्यांना ताब्यात-सुटका

Published on

प्राध्यापिकेच्या अक्षेपार्ह
विधानाविरोधात निदर्शने

कोल्हापूर, ता. १६ ः वर्गात प्राध्यापिकेने अक्षेपार्ह केलेल्या विधानावरून संबंधित प्राध्यापिकेला अटक करा, त्यांनी माफी मागावी यासाठी आज सायंकाळी निवृत्ती चौकात निदर्शने करण्यात आली. कार्यकर्ते संबंधित प्राध्यापिकेच्या घरावर चाल करून जाण्याच्या तयारीत असताना जुना राजवाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून सोडून दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पुढाकारातून हे आंदोलन झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्राध्यापिकेने वर्गात अक्षेपार्ह विधान करताच विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. याचा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी व्हायरल केला. त्यामुळे इंगवले, युवा सेनेचे मंजित माने यांच्यासह इतरांनी कॉलेजमध्ये जावून वरिष्ठांना जाब विचारला. संबंधित प्राध्यापिकेला माफी मागण्यास सांगण्याच्या सूचना केल्या. सायंकाळी सहापर्यंत माफी न मागितल्यास त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान शिष्टमंडळासह कार्यकर्ते निवृत्ती चौकात आले. यामध्ये इंगवले, माने यांच्यासह संभाजी साळोखे, राजू जाधव आणि सुमारे शंभर कार्यकर्ते होते. तेथे ‘जय भवानी जय शिवाजी...’, ‘अटक करा.. अटक करा.... प्राध्यापिकेला अटक करा,’ अशा घोषणा दिल्या. तणावपूर्ण झालेले वातावरण नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविला. कार्यकर्ते प्राध्यापिकेच्या घरावर चाल करून जाताना जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांना सोडून दिले. दरम्यान, संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाने संबंधित प्राध्यापिकेला ५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविले असून, चौकशी करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे पत्रक महाविद्याने प्रसिद्धीस दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com