उपसा बंदी शेतकरी आक्रमक

उपसा बंदी शेतकरी आक्रमक

Published on

एम०९८७६
कोल्हापूर ः उपसा बंदी मागे घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना शेतकरी.

आठवड्यातून
तीन दिवस
उपसाबंदी मागे
कोल्हापूर, ता. १५ ः पाऊस लांबल्याने शेतीला पाणी नाही. त्यामुळे पिके वाळून नुकसान होत आहे. अचानकपणे लागू केलेली उपसाबंदी तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी शेतकरी आज आक्रमक झाले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा करीत उपसाबंदी मागे घेण्याची जोरदार मागणी केली. या वेळी शेतकरी व अभियंते यांच्यात खडाजंगी झाली. अखेर सायंकाळी आठवड्यातील तीन दिवस उपसाबंदी मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले.
दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर येणारा मॉन्सून पाऊस यंदा लांबला आहे. दुसरीकडे महापूर येऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा यापूर्वी रिकामा केला. त्यामुळे धरणात पाणीही नगण्य आहे. टंचाईसदृश स्थितीमुळे पिके करपून जात आहेत. नवीन लागवड नाही. असे असताना उपसाबंदी लागू केली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. नदीतील पाणी उपशास मान्यता द्यावी, यासाठी शेतकरी स्वतःहून पाटबंधारे विभागात आले होते.
त्यांनी अभियंता रोहन बांदिवडेकर यांची भेट घेतली. पिके करपून चालली आहेत. जिल्हाभरात काही कोटींचे नुकसान झाले. उपसाबंदी अजूनही सुरू ठेवली तर शेतकऱ्यांचे आणखी मोठे नुकसान होईल. ही भरपाई कोण देणार? त्यामुळे उपसाबंदी तातडीने मागे घ्यावी, असा मुद्दा इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाजार समितीचे सभापती भारत पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर यांनी मांडला.
यावर बांदिवडेकर यांनी पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे, शेतीला पाणी देण्याबाबत आणखी काही सूक्ष्म नियोजन करता येते का, याचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार रविवार, सोमवार, मंगळवार असे आठवडाभरातील तीन दिवस शेतीसाठी पाणी उपसा करण्यास मान्यता देत असल्याची माहिती बांदिवडेकर यांनी सायंकाळी दिल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com