‘अकरावी’ला अर्ज करण्यास उरले दोन दिवस

‘अकरावी’ला अर्ज करण्यास उरले दोन दिवस

Published on

‘अकरावी’ला अर्ज करण्यास उरले दोन दिवस
आतापर्यंत ३३८६ विद्यार्थ्यांची नोंदणी; कृषी तंत्र पदविकासाठी ३० जूनपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शहरस्तरीय अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास दोन दिवसांची मुदत उरली आहे. रविवार (ता. १८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया समितीकडून अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या प्रक्रियेंतर्गत शुक्रवारी सायंकाळीपर्यंत एकूण ३,३८६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विज्ञान विद्याशाखेच्या २,६३९, तर वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या ७४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एसएससी बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मुख्य केंद्र कमला कॉलेज येथून गुण समकक्ष करून प्रवेश अर्ज भरावा. ऑनलाईन अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सोमवार ते गुरुवारपर्यंत चालणार आहे. दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे (राहुरी) दहावीनंतर दोन वर्षे मुदतीच्या मराठी माध्यमातील कृषी तंत्रपदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० जूनपर्यंत आहे. जिल्ह्यातील शाहू कृषी तंत्र विद्यालय (कसबा बावडा), शासकीय अनुदानित कृषी तंत्रविद्यालय, तळसंदे, कागल, दत्तवाड, परिते, कणेरीमठ, कसबा तारळे येथे विनाअनुदानित तत्त्वावर अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

चौकट
पदवी परीक्षेत कॉपी करताना ११ जण सापडले
विविध ११ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज झाल्या. त्यासाठी १०,७६४ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेदरम्यान कॉपी करताना ११ विद्यार्थी भरारी पथकाला सापडले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ६, सांगलीमधील २ आणि सातारा जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विविध सहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com