गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

10023
गडहिंग्लज : शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ए. बी. पाटील यांचा डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी प्रा. बीना कुराडे, गौरी शिंदे उपस्थित होते.

ए. बी. पाटील यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय ए. बी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार झाला. प्रा. एम. के. नोरेंज यांनी स्वागत केले. शरद कांबळे यांनी शाळेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. कुराडे यांचे भाषण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली. तानाजी कुराडे, प्रा. बीना कुराडे, मुख्याध्यापिका गौरी शिंदे आदी उपस्थित होते.
-------------------
10024
गडहिंग्लज : जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे निखिल कदम व रमेश गडकरी यांचा गजानन सरकर यांच्या हस्ते सत्कार झाला. याप्रसंगी फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

कदम, गडकरी यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे निखिल कदम (बसर्गे, ता. गडहिंग्लज) व रमेश गडकरी (हंदेवाडी, ता. आजरा) यांचा सत्कार करण्यात आला. लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल निखिल व रमेश यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नौकुड येथील सुशांत गोडसे यांची टीईएस एसएसबी परीक्षेतून प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक गजानन सरगर, पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, नेमगोंडा पाटील, बसाप्पा आरबोळे, बाळासाहेब पोवार, संजय जाधव, वसंत गवेकर, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com