नालेसफाई पाहणी

नालेसफाई पाहणी

Published on

10047
नाले सफाईची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी
कोल्हापूर ः विविध ठिकाणी सुरू असलेल्या नाले सफाईची अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पाहणी केली.
विविध लहान व मोठे नाले स्वच्छतेसाठी ४० कर्मचाऱ्यांची टीम, ३ जेसीबी व ४ पोकलॅन मशीनचा वापर केला जात आहे. प्लास्टिकचा कचरा जयंती नाला पंपिग स्टेशन येथे थांबले आहे. ते तात्काळ काढण्याच्या सूचना सहाय्यक अभियंता आर. के. पाटील यांना आडसूळ यांनी दिल्या. काढलेला गाळ दररोज उचलण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे यांना दिल्या. सर्व यंत्रसामुग्री नाले सफाई करता उपलब्ध करून देण्याच्या सूचना कार्यशाळा विभाग प्रमुख चेतन शिंदे यांना दिल्या. आवश्यक असेल त्या ठिकाणी दुबार नाले सफाईची मोहीम घेण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना दिल्या. आरोग्य निरीक्षक महेश भोसले, नंदकुमार पाटील, करण लाटवडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.