कौलगेत झाले 
सहावे नेत्रदान

कौलगेत झाले सहावे नेत्रदान

Published on

10032
इंदुबाई पाटील

कौलगेत झाले
सहावे नेत्रदान
गडहिंग्लज, ता. १८ : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथे सहावे नेत्रदान झाले. इंदुबाई विष्णू पाटील (वय ८९) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करीत पाटील कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपली. नेत्रदान चळवळीत गेल्या तीन दिवसात दुसरे नेत्रदान झाले आहे. तर एकूण नेत्रदात्यांची संख्या ९१ वर पोचली आहे.
चळवळीत गेल्या दोन महिन्यात नेत्रदानाची पाटी कोरीच होती. पण, दोन दिवसापूर्वी ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील आऊबाई कुंभार यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. त्यामुळे चळवळीला पुन्हा गती मिळाली. दरम्यान, आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास कौलगे येथील इंदुबाई पाटील यांचे निधन झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या कुटुंबियांना नेत्रदानाबाबत विचारणा केली. त्यांनी संमत्ती दिल्यानंतर येथील अंकूर आय बँकेच्या पथकाने कौलगे येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. इंदुबाई यांच्या मागे तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी रक्षाविसर्जन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.