जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

Published on

10168

कॅन्सरमुक्त झालेल्या रूग्णांचा
ऑन्कोकेअर सेंटरतर्फे सत्कार

कोल्हापूर ः मुंबई ऑन्कोकेअर सेंटर कोल्हापूर शाखा आणि रेडिओ मिर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने कॅंसरवर मात केलेल्या रुग्णांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा मुंबई ऑन्कोकेअरचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांच्या हस्ते झाला. जुन महिन्याच्या पहिला रविवार कॅन्सर सर्वायवर डे म्हणून साजरा केला जातो. तसेच जुन महिनाही कॅन्सर सर्वायवर मंथ म्हणूनही साजरा होतो. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम झाला. कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या ७० हून अधिक रुग्णांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉ. अक्षय शिवछंद यांनी या रुग्णांच्या सकारात्मक दृष्टीकोन आणि धाडसी वृत्तीचं तसेच त्यांची योग्य ती काळजी घेणाऱ्या कुटुंबीयाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘कर्करूपी राक्षसाचा वध करून आपण समाजातील इतर कॅन्सर रुग्णांना खंबीरपणे लढण्याची उमेद आणि दिशा देत आहात.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.