आरोग्य शिबिरात ६५ रुग्णांची तपासणी

आरोग्य शिबिरात ६५ रुग्णांची तपासणी

Published on

ich1816.jpg
10059
रुई : येथे ख्रिस्ती युवा शक्तीतर्फे आरोग्य शिबिर झाले.

आरोग्य शिबिरात ६५ रुग्णांची तपासणी
रुई : ख्रिस्ती युवा शक्ती व सेवासदन निरामय हॉस्पिटलतर्फे येथे आरोग्य तपासणी शिबीर झाले. संत ख्रिस्तोफर चर्च येथे शिबिर झाले. शिबिरामध्ये ६५ रुग्णांची तपासणी केली. जनरल चेक अपसह रुग्णांची रक्त तपासणी, ईसीजी, हृदयविकार, मुत्ररोग विकार यांसह अन्य तपासण्या व औषधोपचार केले. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना ऑपरेशनची गरज असल्यास योजनेतून व सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची सोय केली होती. इको, टीएमटी, अँजिओग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेवासदन हॉस्पिटलतर्फे डॉ. नितीन जाधव, सुप्रिया जनवाडे, अंजुम मुजावर, आरती शिंदे, देवदान माने आदीचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यादव, शालाबाई साठे, अशोक आदमाने, रोहित पाटील, महाराष्ट्र क्रांती कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष किरण माने आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती युवा शक्तीचे डॉ. एलिया माने, हर्षद तिवडे, संदीप साठे रविराज बिरांजे, सागर साठे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.