प्रवेश प्रक्रिया वेगावली

प्रवेश प्रक्रिया वेगावली

Published on

गुणपत्रिका मिळाली, प्रक्रिया वेगावली
पॉलिटेक्निक, आयटीआय, डी. फार्मसी प्रवेश; विविध दाखल्यांसाठी धावपळ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : दहावी, बारावीच्या गुणपत्रिका गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना मिळाल्या. परिणामी, पॉलिटेक्निक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) औषधनिर्माण शास्त्र पदविका (डि. फार्मसी) प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्रावर पालक आणि विदयार्थ्यांची गर्दी आहे. राखीव गटातील विविध दाखले मिळवण्यासाठी पालकांची पळापळ सुरू आहे.
यंदा बारावीचा २५ मे रोजी आणि दहावीचा २ जूनला ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यानंतर मुळ गुणपत्रिका ही मिळाल्या आहेत. गेल्या आठवड्यात सीईटीचा निकालही जाहीर झाला आहे. पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया यंदा एक जूनपासून निकालाआधीच सुरू झाली. सुरवातीला गुणपत्रिका नसल्याने नोंदणी कमी होती. पंरतु, गुणपत्रिका मिळाल्यानंतर या प्रक्रियेने गती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १९ तंत्रनिकेतनात सहा हजार प्रवेशक्षमता आहे. गेल्या चार वर्षात पॉलिटेक्निककडे विदयार्थ्यांची कल वाढल्याने प्रवेशासाठी गर्दीचे चित्र आहे. सर्वच संस्था सुविधा केंद्र म्हणून कार्यरत आहेत.
पॉलिटेक्निक थेट व्दितीय वर्ष आणि डि फार्मसीची प्रवेश प्रक्रियाही सुरु आहे. बारावीच्या गुणावर यासाठी प्रवेश दिला जातो. आयटीआयची प्रक्रिया तुलनेत यंदा उशिरा सुरू झाली. आठभरापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी ११ जुलै अखेर मुदत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय १२ आणि खासगी ४० अशा ६४ संस्थात ६४३२ प्रवेश क्षमता आहे. खुल्या गटासाठी मुळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला प्रवेशासाठी पुरेसा आहे. राखीव प्रवर्गासाठी जातीचा दाखला , ओबीसी, एनटी गटासाठी नॉन क्रिमिलेअर अत्यावश्यक आहे. आर्थिकद़ष्ट्या दुर्बल घटकासाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. हे दाखले मिळवण्यासाठी पालकांची पळापळ सुरु आहे.
-----------------
दृष्टीक्षेपात प्रवेशाची मुदत
अभ्यासक्रम*अंतिम तारीख
पॉलिटेक्निक*२१ जून
डि फार्मसी*२१ जून
आयटीआय*११ जूलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.