कुकिंग ऑईल, कोहळा अन्‌ भाजीपालाही

कुकिंग ऑईल, कोहळा अन्‌ भाजीपालाही

10187
कोल्हापूर : भाज्यांची आवक पुढील आठवड्यात कमी होईल, असे विक्रेत सांगत आहेत. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)

भाज्या महागण्याची चिन्हे
पाऊस लांबल्याचा परिणाम : बिनीस, आल्ल्याची शंभरी पार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पाऊस कधी सुरु होईल, हे सांगता येत नाही. पण, पुढील आठवड्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे दर वाढतील, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. आज फळभाजी, पालेभाजींची आवक तुलनेने कमी होती. पाऊस पडलाच नाही तर स्थिती बिकट होऊ शकते. विशेषत: पालेभाज्या मिळणे कठीण होईल. वेलवर्गीय भाज्यांचीही अवस्था अशीच आहे. जे काही आहे, ते पावसावर अवलंबून आहे.
कोल्हापूर मंडईत ज्या भाज्या येतात त्या बेळगावसह उत्तर कर्नाटकातील गावे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातून. पाऊस कुठेही नाही. विहिरी, तलाव, ओढे-नाले कोरडे ठक्क पडले आहेत. भाज्यांना पाण्याचे प्रमाण अधिक लागते. पाणी नसेल तर वेलवर्गीय प्लॉट, वाफ्यांमध्ये भाज्यांची उगवण होत नाही. शेतकरी भाजी आणणार कुठून हा प्रश्‍न आहे, असे विक्रेते सांगतात. पुढील काही दिवस तर भाज्या महागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आज वेलवर्गीय भाज्या ५० ते ६० रुपये किलोने विक्री सुरु आहे. हीच विक्री पुढील आठवड्यात १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
...
चौकट
वेलवर्गीय भाज्यांचे दर (प्रतिकिलो)
बिनीस *२००
वरणा *८०
हिरवी मिरची *७०
हिरवी वांगी *६०
लाल टोमॅटो *३०
दोडका *६०
फ्लॉवर *३०
कारली *५०
कांदा *२०
बटाटा *२०
ैआल्लं *२००
लिंबू *१० रुपयाला १० नग
काटे काकडी *५०/६०
...........
10166

खाद्यतेलांच्या दरात काही महिन्यांपासून घट

कोल्हापूशेर, ता. १८ : खाद्यतेलांच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून घट आली. कारण भारतांतर्गत गतवर्षी विविध तेलबियांचे उत्पादन वाढले. याशिवाय, आयात कर कमी झाले. परिणामी, सर्वांनाच खाद्यतेल घेणे परवडू लागले.
कोल्हापूरच्या बाजारपेठेत खाद्यतेलांचे १५ प्रकार उपलब्ध आहेत. यातील अनेक खाद्यतेले बहुतेकांना माहित नाही. फक्त सरकी, शेंगतेल, सनफ्लॉवर तेलच अनेकांना माहिती असते. अन्य खाद्यतेलेसुद्धा अन्नामध्ये वापर होतो. काही ठराविक लोक मात्र हटके अन्य खाद्यतेलांचा वापर करतात. विशेषत: भूमध्य समुद्रात वापर असलेल्या ऑलिव्ह बियांपासून ऑलिव्ह तयार केले जाते. असे ऑलिव्ह ऑईल आता इथेही मोठ्या प्रमाणात मिळते. ते जरी महाग असले तरीही ऑलिव्ह ऑईल वापरणारे लोक खूप आहेत. केमिकलरहित अन्‌ केमिकल विरहित खाद्य तेल आहे का, असे आवर्जुन विचारले जाते. मगच खाद्यतेल घेतले जाते.


चौकट
भुईमुग तेलाचे दर स्थिर
शेंगदाणा आज १२० ते १४० रुपये किलोपर्यंत आहे. मुळात भुईमुगाचे जिल्ह्यातील शेतीतील प्रमाण नगन्य आहे. जिल्ह्यातील तेल घाण्यांमध्ये पूर्वी भुईमुगापासून तेल घेतले जात असे. आता भुईमुगाचे प्रमाणच कमी असल्याने अन्य भागातून भुईमुग घेऊन घाण्यांमध्ये तेल काढले जाते. अन्य खाद्यतेलांचे दर कमी झाले. पण, भुईमुगाचे तेल आजही १९६ रुपये किलोने विक्री सुरू आहे. दुसरेअसे की, भुईमुगापेक्षा सरकी, सनफ्लॉवरला अधिक मागणी आहे, हे नाकारुन चालणार नाही.

कोट
‘खाद्यतेलांचे दर स्थिर आहेत. दररोजची मागणीही भरपूर आहे. लोक ‘हेल्थ कॉन्शस’ असल्याने कसलेही खाद्यतेल घेत नाहीत. खाद्यतेलांची क्वालिटी, दर पाहूनच ते घेतले जाते. तरीही आम्ही ज्यांना जे खाद्यतेल हवे, ते उपलब्ध करुन देतो.
-श्रीतेज अथणे, खाद्यतेलांचे व्यापारी

खाद्यतेलांचे दर (प्रतिकिलो रुपये)
सरकी *११४
भुईमुग तेल *१९६
सनफ्लॉवर *१३६
पाम तेल *११०
हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ओलीन ऑईल *११२
राईसब्रान केमिकल विरहित *१६०
राईसब्रान केमिकल सहित *१३०
सुर्यफुल केमिकल विरहित *१६०
कॉर्न ऑईल *१९०
रिफाईन्ड शेंगतेल *२४०
लाकडी घाण्यातील शेंगतेल *३१०
लाकडी घाण्यातील सुर्यफुल *३१०
लाकडी घाण्यातील करडई तेल *३१०
प्रिमीयम रोस्टेड खोबरेल तेल *३६०
साधे खोबरेल *२५०
प्रीमीयम तीळ तेल *२५०
प्रिमीयम मोहरी तेल *२३५
लाकडी घाणा तीळ तेल *५२० रुपये लिटर
एक्स्ट्राज व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल *९९० रुपये लिटर
एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑईल *९९० रुपये लिटर
पोमास ऑलिव्ह ऑईल *५९० रुपये लिटर
लाकडी घाणा विथ ऑर्गनिक बदाम तेल *२५०० रुपये लिटर
लाकडी घाणा जवस तेल *७९०
...........

पालेभाज्यांची आवक कमी; दर जास्त
कोल्हापूर, ता. १८ : मंडईत पालेभाज्यांची आवक कमी असल्याने प्रति पेंडीमागे दरही जास्त आहेतशेपू, पोकळा, लाल माट, तांदळी, चुका, आंबाडा, कांदापात, करडई, घोळी, चाकवत, मेथी या ठराविक पालेभाज्याच वर्षभर मंडईत उपलब्ध असतात. या पालेभाज्यांच्या दरांची गंमतजंमत असते. तीव्र उन्हाळा सुरु झाला की, पालेभाज्या कमी येतात. अतिपाऊस पडला की, पालेभाज्या कुजून, नासून जातात. त्यामुळे उन्हाळा/पावसाळ्यात पालेभाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतात. हिवाळ्यात मात्र पालेभाज्यांचे दर स्थिर राहतात. आज मेथीचे एक पेंडी २५ ते ३० रुपयांना विकली जात आहे. अन्य पालेभाज्या ही १५ ते २० रुपयांना एक पेंडी असे दर आहेत. जेव्हा पाऊस सुरु होईल, तेव्हा हीच पेंडी ५ ते १० रुपयांना विकली जाते. मेथीच्या बाबतीत तर हा प्रकार सतत सुरु असतो.

चौकट
पोकळ्याची बनवाबनवी
काही ठिकाणी पोकळ १५/२० रुपये आहे, तर काही ठिकाणी १० रुपयाला एक पेंडी आहे. पण पोकळ्याच्या एका पेंडीत दोन पेंड्या करुन १० रुपयांना एक पेंडी विकली जात आहे. ही पेंडी इतकी लहान असते की भाजी करताना ती कमी होते. तरीही अनेकजण दहा रुपयाला पोकळा पेंडी आहे, म्हणून घेतात. खरेतर दोन्ही पेंड्या एक केल्यातर ती दहा रुपयांना मिळते; पण विक्रेते चलाखी करुन एका पेंडीमागे दहा रुपयांचे ‘मार्जीन’ काढतात.

चौकट
पालेभाज्या दर (प्रतिपेंडी) मेथी *२५/३०
कोथींबीर *२०
शेपू, पोकळा, लाल माट, तांदळी *२०
आंबट चुका *२०
आंबाडा, कांदापात, घोळी *२०
पुदीना *५/१०
.....................

10181
कोल्हापूर : रताळे खरेदी करण्यासाठी झालेली गर्दी.

रताळे आले!
कोल्हापूर, ता. १८ : रताळे पूर्वी दसरा सुरु झाला की, मंडईत येत असे. आता रताळे कधीही मंडईत येऊ लागले आहे. कधीकधी ते वर्षभर दिसते. विशेषत: उपवासाकरीता रताळे घेतले जातेच. लाल आणि पांढरी रताळे असून लाल रताळ्यांना अधिक मागणी असते. दसऱ्यानंतर अधिक आवक असते. अन्यवेळेला आवक कमी असते. ते उकडून आणि भाजूनही खाल्ले जाते. २० रुपये किलो दराने आज विक्री झाली. रताळे उत्तर कर्नाटकातून अधिक प्रमाणात येते.
.............

10183
कोल्हापूर : कोहळासुद्धा वर्षभर मिळू लागला आहे.

कोहळ्याला मागणी वाढली.
कोल्हापूर, ता. १८ : पूर्वी आणि आजही कोहळा घेतात, ते चौकटीवर टांगून ठेवण्यासाठी. अमावस्या, पौर्णिमा, अन्य सणवार आले की, कोहळ्याला अधिक मागणी वाढते. पण, हा कोहळा नुसता चौकटीवर ठेवण्यासाठीच नाही, तर भाजी, आमटीसाठी लोक घेऊ लागले आहेत. कोहळ्यातील पाणी, गरांना आयुर्वेदिकदृष्ट्या महत्व असल्याने कोहळा हमखास घेतला जातो. भाजी विक्रेते युवराज बिसुरे म्हणाले, ‘कोहळ्याचे विविध प्रकार करता येतात, हे अनेकांना माहिती झाले आहे. त्यामुळे आमच्याकडे कोहळा घेण्यासाठी लोक अधिक येत आहेत. अगदी लहान-मोठे कोहळे हे ३० पासून ते १०० रुपयांपर्यंत आम्ही देतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात तर सर्वाधिक कोहळ्यांची विक्री केली.’’
........
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर
सोने (प्रति तोळा) : ६१,१३०
चांदी (प्रति किलो) : ७३,५००

㤥㤥㤥��d攌供कक꒤ꓠ螥

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com