आजरा ः गव्याच्या हल्यात महीला जखमी

आजरा ः गव्याच्या हल्यात महीला जखमी

Published on

पेरणोली येथे गव्याच्या
हल्ल्यात महिला जखमी

आजरा, ता. १८ ः पेरणोली (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात शालन विष्णू दारुडकर (वय ४८) ही महिला जखमी झाली. आज दुपारी चार वाजता नालगोंडी शिवार येथे ही घटना घडली. दारुडकर यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, ऊस पिकाची भांगलण करण्यासाठी शेतकरी महिला नालगोंडी शिवारात गेल्या होत्या. उसाची भांगलण सुरु असताना अचानक गव्यांचा कळप हिरण्यकेशी नदीतून उसात घुसला. जोरदार आवाज आल्याने महिला धावत सुटल्या. वेगाने आलेल्या एका गव्याने शालन दारुडकर यांना पाठीमागून धडक दिली. त्या जोरात जमिनीवर आपटल्या व बेशुध्द पडल्या. दरम्यान, काही महिलांनी दूर पळत जाऊन जीव वाचवला. गव्यांचा कळप निघून गेल्यावर महिलांनी याची माहीती ग्रामस्थांना कळवली. गावातील तरुण घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काळाम्मा बेलेवाडी येथील दिलीप पाटील, उदय कोडक, पंडीत कालेकर, अमर कालेकर, मारुती नावलकर यांनी दारुडकर यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी यांनी जखमीची भेट घेवून विचारपूस केली. जखमी दारुडकर यांची प्रकृती स्थिर आहे.
...


शिवारात गव्यांच्या कळपाचा धुडगूस

रविवारी दिवसभर गव्यांच्या कळपाने शिवारात धुडगूस घातला होता. दिवसभर दहा ते पंधरा गव्यांचा कळप उसातून सुसाट फिरत असल्याचे शेतकरी नंदकुमार देसाई व दता सावंत यांनी सांगितले. गव्यांच्या कळपांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.