मॅन्गेट प्रकल्प

मॅन्गेट प्रकल्प

Published on

शेतकऱ्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा

डॉ. सुभाष घुले ः कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे कार्यशाळा आयोजित

कोल्हापूर, ता. १८ ः ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मॅग्नेट प्रकल्पाचा लाभ घ्यावा व त्यातील विविध योजनांमधून केळी पिकातील प्रक्रिया उद्योग विपणन व मूल्यवर्धन करून त्याला योग्य तो भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक तथा मॅग्नेट प्रकल्पाचे विभागीय प्रकल्प उपसंचालक प्रकल्प डॉ. सुभाष घुले यांनी येथे केले.
सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँक अर्थसहाय्याने महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत डी. वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीचे, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे ‘केळीः उत्तम कृषी पद्धती’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. श्री. घुले यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घघाटन झाले. यावेळी ते बोलत होते.
केळीसाठी जी.आय मानांकन व मॅग्नेट प्रकल्पामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकऱ्यांना एकत्रित येऊन लाभ घ्यावा, असेही घुले यांनी सांगितले. यात केळीच्या विविध जाती, लागवडीच्या योग्य पद्धती, पाणी व्यवस्थापनाबद्दल वरिष्ठ कृषीशास्त्रज्ञ सुरेश मगदूम यांनी मार्गदर्शन केले.
केळीतील एकात्मिक खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती कृषी विज्ञान केंद्र, तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी दिली. मधुकर माळी यांनी केळीमधील कीड रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. तर केळी पिकवण्याच्या पद्धतीविषयी दिपाली मस्के यांनी माहिती दिली. सुधीर सूर्यगंध यांनी सुत्रसंचालन केले.राजवर्धन सावंत भोसले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.