

12256
अध्यक्षपदी बुचडे
महेश दाते उपाध्यक्ष
इचलकरंजी ः इचलकरंजी इंजिनिअरींग असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच झाली. त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी विक्रम बुचडे यांची तर उपाध्यक्षपदी महेश दाते यांची निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुडचे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची प्रक्रीया झाली. अन्य कार्यकारणी अशी, कार्यवाह - राहूल सातपूते, सहकार्यवाह - मिलिंद बिरादार, कोषाध्यक्ष - कुणाल जगदाळे, संचालक - अमोद कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, रविंद्र नाकिल, अभिजीत सातूपते, नागेश पुजारी, नंदकिशोर मुसळे, धनंजय भाटले, असीम कुलकर्णी, रोहन कुलकर्णी, विनायक बिडकर, शिवाजी लोखंडे. नूतन पदाधिका-यांचा सत्कार केला. नूतन अध्यक्ष बुचडे यांनी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
----------
एकदशीदिवशी
बकरी ईद नाही
कुंभोज ः तब्बल बारा वषा॔नी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने येथील मुस्लिम बांधव आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाहीत तसा निर्णय झाल्याची माहीती सुन्नत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रईस मुजावर यांनी दिली. दर्गा मशीदीत सुन्नत मुस्लिम जमातची बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेतला. बैठकीस वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चाँदसो मुजावर, मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जहाँगीर हजरत, उपाध्यक्ष मुबारक मुल्ला, सदस्य शकील मकानदार, शहानवाज मुजावर, आरिफ तांबोळी, राजू मुजावर, तय्यब सुतार आदी उपस्थित होते.
-----------
मुख्याध्यापकपदी
संजीव देसाई
आजरा ः येथील पं. दीनदयाळ विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी संजीव यशवंतराव देसाई यांची नियुक्ती झाली आहे. वीस वर्षाहून अधिक काळ ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेचे सचिव डॉ. सुधीर मुंज, मुख्य कार्यकारी अधिकारी मलिककुमार बुरुड, खजिनदार रमेश कारेकर, संचालिका श्रीमती भुसारी, आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक आनंदा कुंभार, भारतीय जनता पार्टी आजराचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई, नाथा देसाई आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.