राऊतला केले निलंबित

राऊतला केले निलंबित
Published on

एपीआय राहूल राऊत निलंबित
अमरावती आयुक्तांचा आदेश : गडहिंग्लजमधील आत्महत्या प्रकरण भोवले

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह केलेल्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अमरावतीचे सहायक पोलिस निरीक्षक राऊत श्रीधर राऊत याला आज निलंबित करण्यात आले. अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याच्या निलंबनाचा आदेश काढल्याचे येथील पोलिसांनी सांगितले.
लैंगिक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून एक कोटीच्या खंडणीसाठी जाच सुरू केल्याने शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरुन माजी नगरसेविकेसह एपीआय राहूल राऊत याच्याविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटकातील विजापूर येथून या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोन्ही संशयितांची पाच दिवसांची पोलिस कोठडी उद्या (ता. 30) संपणार आहे. दरम्यान, ४८ तास अटकेत राहिल्याने राऊत याला अमरावतीच्या आयुक्तांनी निलंबित केले आहे. या निलंबनाचा आदेश येथील पोलिस ठाण्याला विशेष कर्मचाऱ्या‍करवी आज सायंकाळी सातच्या सुमारास प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात त्याने कोणत्याही प्रकारची हालचाल करु नये, पोलिस तपासात दबाव आणू नये या प्रमुख कारणाने त्याला निलंबित केल्याचे आदेशात म्हटले आहे. पुढील आदेशापर्यंत ही निलंबनाची कारवाई असल्याचेही सांगण्यात आले.

चौकट
राऊतच्या विरोधातील तक्रारींना उजाळा
राहूल राऊत याचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील निलजी होय. वडीलांनी त्याला स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले होते. परंतु, पोलिस अधिकारी झाल्यानंतरच्या त्याच्या वर्तनाबद्दल नातेवाईकही हादरले आहेत. गडहिंग्लजमधील गुन्ह्याच्या निमित्ताने पूर्वी त्याच्या विरोधात यवतमाळ, मारेगाव, राजापेठ, कोतवाली, मुंबईत झालेल्या विविध तक्रारींनाही उजाळा मिळत आहे. कोतवालीतील तक्रारीनंतरच त्याची अमरावती कंट्रोल रुमला बदली केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com