आरोग्य विभागाची बैठक बोलवा

आरोग्य विभागाची बैठक बोलवा

Published on

gad32.jpg
13586
गडहिंग्लज : शिवसेनेतर्फे विवेक काळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजय संकपाळ, अशोक शिंदे, वसंत शेटके, मनोज पोवार उपस्थित होते.
----------------------------
आरोग्य विभागाची बैठक बोलवा
शिवसेनेची मागणी; दलदलीबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : पावसाचे पाणी साचून दलदलीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रोगराई होण्याचा संभव आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक बोलावून योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेतर्फे केली आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचून दलदलीचे प्रमाण वाढत आहे. मागील दोन वर्षांत शहरासह तालुक्यातील नागरिकांना चिकनगुणिया व डेंगीचा सामना करावा लागला होता. या वेळी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी आरोग्य विभागाची बैठक बोलावून योग्य ते निर्देश द्यावेत. लोकांच्या आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
प्रांताधिकारी विवेक काळे यांनी निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय संकपाळ, शहरप्रमुख अशोक शिंदे, माजी शहरप्रमुख सागर कुराडे, उपशहरप्रमुख वसंत शेटके, राहुल खोत, दत्ता कोरवी, मनोज पोवार, सचिन पोवार, सुनील कांबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.