कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. सातप्पा खरबडे

कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. सातप्पा खरबडे

13650

कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी
अधिष्ठातापदी डॉ. साताप्पा खरबडे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. साताप्पा खरबडे यांची नियुक्ती झाली आहे. महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या या पदावर डॉ. खरबडे यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. खरबडे याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी यापूर्वी नंदुरबार, कऱ्हाड येथील शासकीय कृषी महाविद्यालयांचा कार्यभार सहयोगी अधिष्ठाता या पदावरून सांभाळला आहे. कीटकशास्त्रज्ञ म्हणून २२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांचे ६० पेक्षा जास्त शोधनिबंध विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय सुमारे १०० तांत्रिक लेख विविध संशोधनपत्रिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले असून, ३५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. डॉ. खरबडे यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शैलेंद्र कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अविनाश भोसले, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव पाचपुते, विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. भारत कोलगणे, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. संग्राम धुमाळ आदींनी केले.

चौकट
जैविक कीडनियंत्रणपद्धती शोधण्यात मोठा वाटा
डॉ. खरबडे यांनी पाच बाह्यपुरस्कृत संशोधन प्रकल्पांवर प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. त्याद्वारे जैविक कीडनियंत्रणपद्धती शोधून काढण्यात महत्त्‍वाचा वाटा उचलला आहे. राज्य व केंद्राच्या सेंद्रिय शेती मार्गदर्शक समितीसह इतर अनेक समित्यांवर तज्ज्ञ आणि कृषी कीटकशास्त्राशी संबंधित १० संस्थांशी ते फेलो म्हणून कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com