पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित
Published on

बिंदू चौकात एकाचा बेशुद्ध पडून मृत्यू
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर बाग येथील एकाचा बिंदू चौकात बेशुद्ध पडून मृत्यू झाला. निरंजन विनोद जोशी (वय ३९) असे त्यांचे नाव आहे. काल (ता.२) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते बिंदू चौक परिसरातील एका लॉजजवळ बेशुद्धावस्थेत आढळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
-
दुचाकीच्या चाकात पदर अडकून महिला जखमी
कोल्हापूर : कोगे (ता.करवीर) येथे दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून पडून महिला जखमी झाली. सुवर्णा राजाराम चव्हाण (वय ६२, रा. कोगे, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. काल दुपारी दीडच्या सुमारास त्या नातेवाईकांच्या दुचाकीवरून जात होत्या. कोगे येथील कमानीजवळ त्यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडक्यामुळे त्या खाली पडल्या. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचार सीपीआरमध्ये केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-
गिरगावला बोअरमधील मोटर, केबलची चोरी
कोल्हापूर ः गिरगाव (ता. करवीर) येथे चोरट्याने बोअरमधील तीन एचपीची मोटर, केबल आणि नॉयलॉनची दोरी असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. २९ जून ते २ जुलैदरम्यान ही चोरी झाली. याबाबतची फिर्याद आदित्य पाटील यांनी काल इस्पुर्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पाटील यांनीच ही बोअर बसविली आहे.
-
लक्ष्मीपुरी, जुना देवल क्लब येथून दुचाकीची चोरी
कोल्हापूर ः लक्ष्मीपुरी आणि जुना देवल क्लब येथे पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरून नेल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
लक्ष्मीपुरी बाजारातत रस्त्याकडेला पार्क केलेली दुचाकी काल दुपारी चोरट्याने पळविली. याची फिर्याद मंगळवार पेठेतील चंद्रकांत शंकरराव पाटील यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. दोन दिवसांपूर्वी जुना देवल क्लबजवळ बिंदू चौक रोडवर पार्क केलेली दुचाकी पळविली. याची फिर्याद जागृती नगरातील संजय शंकरराव पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.