निवेदन

निवेदन

‘देवस्थान समिती’वर जिल्हाधिकारीच हवेत कायम प्रशासक
कोल्हापूर, ता.३ ः देवस्थान व्यवस्थापन समितीवर कायमस्वरूपी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडेच कायम कार्यभार राहावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, समितीचा कार्यभार आपल्याकडे आल्यापासून प्रशासनात आमूलाग्र बदल झालेला आहे. मागील समित्यांच्या अनागोंदी कारभार व त्यानुसार त्यावर स्थापन केलेल्या चौकश्या समित्या व त्यांचे अहवाल यांचा विचार करता राजकीय पक्षांना यावर सदस्य यावर नेमू नयेत यासाठी हवेतर समितीच्या घटनेत बदल करून त्याविषयीचा बृहत प्रस्ताव विधी व न्याय सादर करणेकरिता माननीय न्यायमूर्तींची कमिटी करावी. कारण राजकीय सदस्यांना जमीन, महसूल इत्यादीची यथायोग्य माहिती नाही. इनाम जमिनीची सर्व कामे महसुल विभागांतर्गत येत येतात. ही पदे देवस्थान, समाजहिताची न होता ती त्यांची घरे भरण्यासाठीची हक्काची सोय झाली आहे. तसेच शिर्डी देवस्थानबाबतीत सुप्रीम कोर्टाच्या महत्वाच्या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे की देवस्थानांवर राजकीय सदस्य नेमू नयेत. तुळजापूर देवस्थानचा कार्यभार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली असल्याने उत्पन्नात चांगली वाढ झालेली प्रत्यक्ष दिसत आहे. तसेच कोल्हापूर येथील समितीने हे पाऊल उचलावे. देवस्थान समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांचे महत्वाची लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्रातील व कोणत्याही इतर देवस्थानच्या तुलनेने समितीकडे ३०६८ मंदिरे व २७ हजार एकर जमीन आहे. एवढी मोठी मालमत्ता राजकीय सदस्य व पक्ष सांभाळू शकत नाही व शकणार नाहीत. यावेळी, प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकर मादनाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष अजित पोवार उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com