‘टीपी’मध्ये प्रकरणे प्रलंबित

‘टीपी’मध्ये प्रकरणे प्रलंबित

Published on

‘टीपी’मध्ये प्रकरणे प्रलंबित
अधिकारी नसल्याचा परिणाम; टाळे ठोकण्याचा इशारा
कोल्हापूर, ता. ६ ः सहा महिने नगररचना विभागात (टीपी) सहाय्यक संचालकपद रिक्त आहे. तेथील कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने महापालिकेच्या या महत्त्वाच्या खात्यातील असंख्य कामे प्रलंबित आहेत. नागरिक हेलपाटे मारून वैतागले आहेत. नवीन अधिकारी नियुक्त केला नाही, तर कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेलद्वारे दिलेल्या निवेदनात दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, सांगली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रभारी कार्यभार दिला आहे. ते बहुतांश वेळा येथील महानगरपालिकेत उपस्थित नसतात. तास-दोन तासांसाठी भेट देऊन जातात. त्यामुळे शहराच्या महत्त्वाच्या खात्याचा कारभार ठप्प आहे. बांधकाम परवाने, ले-आउट आदी कामे प्रलंबित आहेत. या कामांची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. अधिकारी आहेत का पाहण्यासाठी नागरिक हेलपाटे मारून वैतागले आहेत. त्यामुळे बांधकामाची कामे ठप्प होऊन अनधिकृत कामांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहर विकासाच्या आणि महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने ही गंभीर आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करून तातडीने काही दिवसात सहायक संचालकांची नियुक्ती करावी. अन्यथा नगररचना विभागाच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन करावे लागेल. निवेदनावर अशोक पोवार, रमेश मोरे, पप्पू सुर्वे, लहुजी शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश जाधव, रणजित पवार, राजाभाऊ मालेकर, सुरेश कदम, चंद्रकांत पाटील, रमेश पवार, जलराज कदम, रामभाऊ कोळेकर, अंकुश कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.