‘झेप’च्या विद्यार्थ्यांची फौजदार पदाला गवसणी

‘झेप’च्या विद्यार्थ्यांची फौजदार पदाला गवसणी

gad65.jpg :
14406
सचिन पाटील, बंडू गवळी
-------------------------------------------
‘झेप’च्या विद्यार्थ्यांची
फौजदार पदाला गवसणी
गडहिंग्लज, ता. ६ : येथील झेप स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. सचिन बाळगोंडा पाटील (महागाव) व बंडू शिवाजी गवळी (गडहिंग्लज) अशी या जिद्दी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
बंडू याने बीबीए तर सचिन याने मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. अधिकारी बनण्याचे ध्येय उराशी बाळगून दोघांनी मोठ्या कष्टाने तयारी केली. त्यांना यशही मिळाले. झेप ॲकॅडमीच्या अभ्यासिकेत त्यांनी अभ्यास केला होता. सचिनचे वडील बाळगोंडा हे महावितरणच्या सेवेतून निवृत्त झाले असून बंडूचे वडील शिवाही हे हमाली करतात. त्यांना ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष डॉ. बाबासाहेब पाटील, खजिनदार महेश मजती, सचिव संदीप कागवाडे, सहसचिव प्रा. वासुदेव मायदेव यांचे प्रोत्साहन तर अधीक्षक गौरी बेळगुद्री, प्रशिक्षक विवेक दड्डी, प्रदीप माळी, विजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
पाच वर्षात झेपच्या २७ प्रशिक्षणार्थींची शासकीय खात्यामध्ये विविध पदावर निवड झाली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या मार्गदर्शनाने ही अकॅडमी सुरु आहे. गडहिंग्लज विभागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. चौगुले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com