जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा शल्य चिकित्सक

Published on

कोरोना काळातील साधनसामुग्रीचे काय करणार?
जिल्हा शल्य चिकित्सकांसमोक उपचार सेवेला शिस्त लावण्याचे आव्हान

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ६ ः जिल्ह्यात कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेकडे कोट्यवधीची विनावापर पडून असलेल्या उपचारपूरक साधन सामुग्रीचे करणार येथेपासून ते ग्रामीण रूग्णालयातील सुस्तावलेल्या उपचार सेवेला शिस्त लावण्याचे आव्हान नव्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासमोर आहे.
जिल्ह्यात चार वर्षापूर्वी कोरोना आला. पहिल्या वर्षी १ लाख २७ हजार रूग्णांवर उपचार झाले. मृतांची संख्या दीड हजारांवर पोहचली. याच वेळी शासकीय आरोग्य यंत्रणा नेटाने उपचार सेवा देत होती. यात केंद्र व राज्य शासन, विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती संस्थांनी आरोग्य सेवेला उपचारपूरक यंत्रणा दिली. यात व्हेन्टीलेटर, मास्क, ऑक्सिजन प्रकल्प इथपासून ते आयसीयु युनीटमध्ये लागणाऱ्या साधने दिली. यात काही साधन सामुग्री शासकीय आरोग्य यंत्रणेने खरेदी केल्या. याखरेदीची जबाबदारी तेव्हा जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाकडे होती. तसेच साहित्य साधन सामुग्री खरेदीसाठी समिती कार्यरत होती. यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय शिक्षणचे अधिक्षक यांचाही समावेश होता. दीड वर्षात कोरोनाचे संकट निवळले. यातच त्या खरेदी प्रक्रीयेत माहिती असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
जिल्हा परिषदेच आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांची नुकतीच बदली झाली, तर तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांची बदली सात महिन्यापूर्वीच झाली. त्यानंतर शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक हुबेकर होते. त्यांचीही बुधवारी (ता.५) बदली झाली. याच कालावधीत कोरोना कमी झाल्याने रोज पन्नास ते दिडशे स्वॅब तपासणी होत आहे. असे असताना वैद्यकीय शिक्षणकडे असलेल्या जिल्हा प्रयोग शाळेकडे स्वॅब तपासणीची तीन मशीन आहेत. यातील एकच मशीनचा वापर होतो. उर्वरीत दोन मशीन पडून आहेत. सीपीआरमध्ये ऑक्सिजन ४०० बेडला लावणलेत. याशिवाय गडहिंग्लज व इचलकरंजीतही ऑक्सिजन सुविधा कोरोना काळात घेतली. त्याची क्षमता एका वेळी शंभर रूग्ण वापर शकेल अशी होती. सद्या तेवढ्या यंत्रणेची गरज सद्या उरलेली नाही. त्यामुळे अतिरिक्त यंत्रणा बंद आहे किंवा पडून आहे. त्याचे काय करणार याच निर्णय कोणत्याच पातळीवर झालेला नाही.

एकत्रित निर्णय घेण्याची गरज
कोरोना काळातील साधन सामुग्रीचा मेळ घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकत्सक, आरोग्य अधिकारी व अधिष्ठाता यांनी एकत्रित निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा कोट्यावदीची सामुग्री खराब होण्याची चिन्ह आहेत.

.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.