डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड

14414
मृण्मयी घोरपडे
14416
मधुमती देसाई
14417
उद्धव पाटील

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या
१२० विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड
कोल्हापूर, ता. ६ ः कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या १२० विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना तीन लाखांपासून सात लाखांपर्यंतचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांनी भेट दिली. यामध्ये अपोलो टायर्स, आर. एल. इ इंटरनॅशनल, एल. अँड टी, प्राज, व्हील्स इंडिया, आर. डी. सी काँक्रिट, रिलायन्स रिटेल, विप्रो-पारी, घाटगे-पाटील इंडस्ट्री, झंवर इंडस्ट्री, डी. एक्स टेक्नॉलॉजी, विलो माथर प्लट, महाबळ इंडस्ट्री अशा औद्योगिक क्षेत्रांतील विविध कंपन्यांचा समावेश आहे. मृण्मयी घोरपडे हिला अपोलो टायर्सतर्फे सहा लाख रुपयांचे पॅकेज मिळाले. उद्धव पाटील आणि मधुमती देसाई यांची आर. एल. इ इंटरनॅशनल या कंपनीत निवड झाली असून, त्यांना ४.३ लाखांचे पॅकेज मिळाले. किरण कांबळे (एल. अॅण्ड. टी), सोहम कुंभार (आर.डी.सी काँक्रिट), यशश्री जाधव (प्राज) यांना चार लाखांचे पॅकेज मिळाले. तसेच निखिल पाटील, प्रसाद पाटील, प्रतीक साळोखे, ऋषिकेश जाधव, समृद्धी मुळे, स्वप्नील पवार या सहा विद्यार्थ्यांची विप्रो-पारीमध्ये निवड झाली असून, त्यांना ३.८ लाखांचे पॅकेज मिळाले, तर अभिषेक पाटील आणि सुमित भोसले यांची टी. सी. एस कंपनीमध्ये, तर अन्य १८ जणांना डी. एक्स. टेक्नॉलॉजीमध्ये ४.२ लाख रुपये पॅकेज मिळाले आहे.
प्लेसमेंटसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीसाठी विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर, कॅम्पस ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग मकरंद काइंगडे, डिपार्टमेंटल ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विराज पसारे, प्रा. उत्कर्ष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com