पादचारी पुल रेल्वेच्या कोर्टात

पादचारी पुल रेल्वेच्या कोर्टात

Published on

परीख पुलाजवळील पादचारी पुलचा
सुधारीत आराखडा रेल्वेकेडे सादर
कोल्हापूर, ता. ६ : परीख पुलाजवळील पादचारी पुलाच्या आराखड्यातील त्रुटींची दुरूस्ती करून आज तातडीने तो महापालिकेने रेल्वेच्या पुणे कार्यालयात सादर केला. आता मंजुरीचा चेंडू रेल्वेच्या कोर्टात आहे.
अडीच कोटींवर खर्च गेलेल्या पादचारी पुलाचा आराखडा रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार बनवण्यात आला होता. त्याबाबतच्या मंजुरीसाठी बुधवारी मुंबईतील मध्य रेल्वेच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये महापालिकेने सल्लागार एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते. सादर केलेल्या आराखड्यात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरूस्त करून पुणे येथील कार्यालयात सादर करा. तिथून मुंबई कार्यालयात आल्यानंतर मंजुरी दिली जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे सल्लागार कुलकर्णी यांनी तातडीने त्रुटी दुरूस्त करून नवीन आराखडा मध्यरेल्वेच्या पुण्यातील कार्यालयात सादर केला. तिथून तो मुंबई कार्यालयात जाऊन तिथून मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिका आता रेल्वे विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.