महापालिका समिती

महापालिका समिती

Published on

शहरामध्ये ११ ठिकाणी स्वच्छतागृहे
कोल्हापूर, ता. ६ ः शहरामध्ये महिला व बालकल्याण विभागातर्फे ११ ठिकाणी स्वच्छतागृहे बांधून पूर्ण केल्याची माहिती महापालिकेतर्पे देण्यात आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतलेल्या आढाव्यावेळी ही माहिती दिली.
बाजारपेठ, भाजी मंडई, बस थांबे या ठिकाणी महिला व बालकल्याण विभागाच्या निधीमधून वॉश बेसिनसह स्वच्छतागृहे प्रस्तावित केली होती. त्यातील यल्लमा मंदीर ओढ्यावर, शाहू खासबाग मैदान केएमटी बस स्टॉप, खराडे कॉलेज, जयप्रकाश नारायण उद्यानमध्ये अशा ठिकाणी बांधून कामे पुर्ण केली होती. पंचगंगा नदीघाट परिसर येथे फिरते शौचालय उपलब्ध करुन दिले आहे. काही ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करता आली नाहीत. शहरात सात ठिकाणी आकांक्षी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असून आवश्यक तांत्रिक मान्यता घेण्याचे काम सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.