रिक्षाने नेले महिलेला फरफटत

रिक्षाने नेले महिलेला फरफटत

14454

कोल्हापूर ः सायबर चौक ते माऊली चौक या दरम्यान गुरुवारी एका रिक्षा चालकाने महिलेला असे फरपटत नेले.

रिक्षाने फरपटत नेल्याने महिला जखमी
सायबर ते माऊली चौक दरम्यान प्रकार; चालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः रिक्षा भाडे आकारणी वादातून रिक्षाचालक तेथून वेगाने निघून गेला. रिक्षाच्या मागील पिवळ्या सेफ्टी गार्डमध्ये महिलेची साडी अडकली. यामुळे रिक्षाने सुमारे शंभर मीटरपर्यंत महिलेला रस्त्यावरून फरपटत नेले. सायबर चौक ते माऊली चौक दरम्यान आज दुपारी ही घटना घडली. यात मीना धनपाल साठे (वय ६२, रा. पंत मंदिराजवळ, राजारामपुरी, १४ वी गल्ली) जखमी झाल्या. हलगर्जीपणाने रिक्षा चालविल्यामुळे सज्जाद अमिद मोमीन याच्याविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले, की मीना खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून त्या घरी पंत मंदिराजवळ रिक्षातून आल्या. तेथे चालक आणि त्यांच्यात भाडे रकमेवरून वाद झाला. त्यामुळे स्थानिकांनी गर्दी केली. नागरिकांनी रिक्षा चालकाला जाब विचारताना त्याने भीतीने रिक्षा भरधाव नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रिक्षाचा आधार धरून उभ्या राहिलेल्या मीना यांची साडी रिक्षाच्या मागील पिवळ्या सेफ्टी गार्डमध्ये अडकली. भरधाव वेगाने गेलेल्या रिक्षाने त्यांना रस्त्यावरून सुमारे १०० मीटरहून अधिक फरपटत नेले. स्थानिकांनी रिक्षाचा पाठलाग करीत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांकडून मारहाण होईल म्हणून चालक मोमीनने रिक्षा भरधाव नेली. अखेर त्याने रिक्षा थांबविली. यावेळी स्थानिकांनी चालकास चोप दिला. रिक्षाची पुढील काचही फोडली.
मीना यांचा मुलगा किरण धनपाल साठे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मोमीनवर गुन्हा दाखल केला. मीना यांनी गार्डला धरल्यामुळे त्यांचे डोके रस्त्यावर घासले नाही; एका बाजूला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.
व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. सायंकाळनंतर अनेकांच्या मोबाईल स्क्रिनवर हा व्हिडिओ फिरत होता.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com