सायबर महाविद्यालय सत्कार

सायबर महाविद्यालय सत्कार

Published on

14837
कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात, डॉ. दीपक भोसले, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. सुरेश आपटे.

विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी सजग राहावे
डॉ. यशवंतराव थोरात; सायबर महाविद्यालयात यशस्वीतांचा सत्कार
कोल्हापूर, ता. ८ : विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी कायम सजग असणे गरजेचे असल्याचे मत नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केले. ते सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, ‘पालक, शिक्षक व विद्यार्थी या तिन्ही परस्पर पूरक घटकांमधील संवाद हरवत चाललेला असून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे व पर्यायाने शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी होऊन जाते. खरं तर शिक्षण ही खूप व्यापक संकल्पना असून, या व्यवस्थेमुळे वास्तविक पाहता, माणसाचे जीवनमान बदलणे अभिप्रेत आहे. एकंदरीतच समाजात सुसंवाद वाढणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयप्रती सजग राहावे.’
डॉ. थोरात यांच्या हस्ते समाजकार्य विषयातून नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थिनी, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये नियुक्त विद्यार्थिनी व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांमध्ये सहभाग घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला. अपूर्वा शेलार, अतुल जाधव, शीतल माखरे, अभिजित शिंगाडे, ऋतुजा शेवाळे, प्रीतम सासणे, अर्पिता राऊत, पूर्वा सावंत, सोनाली पाटील, रामेश्वर राजगुरू, शाहीर शिवानंद पोळ व ओजस्वी ठोसर यांना सन्मानित करण्यात आले.
विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. टी. व्ही. जी. शर्मा यांनी सायबर संस्थेची उपस्थितांना ओळख करून दिली. सूत्रसंचालन प्रा. पूनम माने यांनी केले. प्रा. शर्वरी काटकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सोनिया रजपूत, डॉ. दुर्गेश्वरी, प्रा. महिंद्र जनवाडे, प्रा. विशाखा आपटे, प्रा. उर्मिला चव्हाण उपस्थित होते. सायबरचे सचिव व व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. रणजित शिंदे, विश्‍वस्त ऋषिकेश शिंदे, संचालक डॉ. एस. पी. रथ व प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळुंखे यांचे सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.