ऋतूराज पाटील- रंकाळा टॉवर

ऋतूराज पाटील- रंकाळा टॉवर

Published on

14864
कोल्हापूर ः रंकाळा टॉवर येथील वाहतूक कोंडीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार ऋतूराज पाटील.

रंकाळा टॉवर वाहतूक कोंडीवर
तत्काळ उपाययोजना कराव्यात
ऋतुराज पाटील; अधिकाऱ्यांसमेवत केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः शहरातील रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा बाल गणेश मंदिर चौकात सायंकाळी होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत तत्काळ उपाययोजना करा, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. महापालिकेच्या अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
शहराच्या पश्चिम बाजूला रंकाळा टॉवर चौकातून गगनबावडा तसेच तळकोकणाकडे जाणारी सर्व वाहने ये-जा करतात. ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी, नोकरदार यांच्या वाहनांचीही सायंकाळी वर्दळ असते. अरुंद रस्ता, बेशिस्त पार्किंग, फिरत्या विक्रेत्यांचे रस्त्यावर व वाहनात लावण्यात आलेले स्टॉल्स यामुळे वाहतूक कोंडी होते. फेरीवाले आणि इतर विक्रेते यांच्यासाठी शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या जागेत वाहने पार्किंग करण्यात यावीत. या ठिकाणीं असणारे दोन विजेचे पोल बाजूला करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या. या वेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे ,अर्जुन माने, राहुल माने, प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.