-

-

Published on

‘सिद्धगिरी’तर्फे निगवे दुमालात आरोग्य शिबीर
वडणगे : सिद्धगिरी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कणेरी मठ आणि ग्रामपंचायत निगवे दुमाला यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्‍घाटन सुशांत जासूद यांच्या हस्ते झाले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या शासनाच्या योजने अंतर्गत सिद्धगिरी हॉस्पिटल येथे पुरवली जात आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवण्याकरिता या शिबिराचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. शिबिराचा ११० रुग्णांनी जणांनी लाभ घेतला. याप्रसंगी सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉ. सुशांत सुतार, नेत्ररोग तज्ञ डॉ. दीपाली चव्हाण, सागर गोसावी, कर्मचारी, माजी उपसरपंच सूरज एकशिंगे, चंद्रकांत किडगावकर, अर्जुन पाटील, संतोष एकशिंगे, बत्तास एकशिंगे, कृष्णात चेंदगे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.