डीकेटीई मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीई मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्यांची निवड

Published on

ich91.jpg
14935
इचलकरंजी ः थरमॅक्स कंपनीमध्ये निवड झालेले डीकेटीईचे मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी.

डीकेटीई मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्यांची निवड

इचलकरंजी, ता. १० ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल आणि इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमधील मेकॅनिकल विभागातील १२ विद्यार्थ्यांची थरमॅक्स या नामांकीत कंपनीत कॅम्पस इंटरव्हयूव्दारे निवड झाली. उर्जा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनिअरींच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी डीकेटीई व थरमॅक्स सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार डीकेटीईमध्ये कॅम्पस प्लेसमेंट घेतली. यामध्ये या विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
थरमॅक्स कंपनी ही उर्जा क्षेत्रातील नामवंत कंपनी असून त्यांची वार्षिक उलाढाल ५.५ अब्ज रुपये आहे. डीकेटीई व थरमॅक्स या करारांतर्गत चार महिन्याचा आणि एकूण २०० तासांचा पॉवर प्लॉट इंजिनिअरींग हा कोर्स डीकेटीईतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग आणि थरमॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लॉट इंजिनिअरींग या विषयाच्या प्रॅक्टीकल ज्ञानात भर पडली. सम्मेद चौगुले, सौरभ होनमनी, अद्वैत जोशी, ओम कोष्टी, अविनाश पवार, जयेश राव, श्रवण सातपुते, श्रीप्रसाद दुरगडे, अनिकेत नरखेडे, ओंकार निर्मळे, संकेत सुर्यवंशी, यश जावध यांची निवड झाली आहे. त्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे व विश्‍वस्तांनी शुभेच्छा दिल्या. प्रभारी संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक, टीपीओ प्रा. जी. एस. जोशी व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.