दर्भाच्या गवताचा आढळ कमी
15069
जिल्ह्यात दर्भ गवताचा
आढळ होतोय कमी
धार्मिक कार्यात वापर; आयुर्वेदातही महत्व
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : नदीच्या काठावर झालेल्या मानवी अतिक्रमणामुळे नदीच्या आजूबाजूला असणारी अन्य गवते, वनस्पतींप्रमाणे दर्भाच्या गवताचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. मुळात दर्भ गवत नदी, ओढ्याच्या काठीच आढळते. ते अन्य ठिकाणी दिसत नाही. धार्मिक सुवर्णापेक्षा दर्भाला अधिक महत्व असल्याचे मानले जाते, मात्र सध्या या गवताचा आढळ जिल्ह्यात कमी होत आहे.
जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या मातीची विक्री सुरु आहे. शिवाय, नदीला लागून असलेल्या झाडांची तोडणी होत असल्याने पावसाळ्यात नदीचे पात्र बदलते. पात्र बदलेली की, नदीकाठी असलेली जैवविविधता नष्ट होते. अशावेळी नदीच्या बाजूला असलेल्या विविध गवतांवरच्या अधिवासावर परिणाम होऊ लागला आहे. या अधिवासात दर्भ गवतही येते. ते उष्ण भागात, ओलसर ठिकाणी सापडते. कुश, सहस्त्रपर्ण, शतकंद नावानी ते ओळखलं जाते.
ते नदीकाठी उगवत असले तरी ते ओळखणे कठीण असते; कारण अन्य गवतांसारखेच ते दिसते. दर्भ अनेक वर्षे जगणारे गवत आहे. कोकण प्रांत, कोल्हापूर जिल्ह्यातील जलस्त्रोतांच्या बाजूला हे गवत आढळते. तळापासून दर्भाला अनेक फांद्या येतात. जमिनीतील खोड जाडजूड, आडवे वाढणारे असते. जमिनीवरील खोडाच्या तळ भागापासून निघून पुन्हा जमिनीसरपट वाढणारी शाखा निघते. कणखर, चकचकीत, खोडास वेढणाऱ्या पानांच्या तळांनी ते झाकलेले असते. डिसेंबर महिन्यात दर्भाला कणिस येते.
...
दर्भाचे आयुर्वेदिक महत्व
- अथर्ववेद, ऋग्वेद, तदुत्तर ग्रंथांत औषधी उपयोगांचा उल्लेख
- इतर औषधांबरोबर काढा करून आमांशावर वापरतात
- दर्भाचे खोड, फांद्या उत्तेजक, मूत्र साफ करणाऱ्या
- दर्भाच्या मुळ्या थंडावा देतात
----------
दर्भाचे अन्य उपयोग- स्वस्त बदामी कागद बनविण्यासाठी धाग्यांचा उपयोग
- योगसाधना, योगासनांसाठी आसनांची निर्मिती
- दोर बनविण्यास धाग्यांचा वापर
- दर्भाची चटई, अंगठी तयार होते
---------------
कोट
अन्य गवतांप्रमाणे दर्भाच्या गवताचा आढळ हा तुलनेने कमी असतो. धार्मिक विधींबरोबर आयुर्वेदिकदृष्ट्याही दर्भाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे दर्भ गवताचे जतन करणे आवश्यक आहे. दर्भाची गवत शेती केली तर ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकते.
- डॉ. मधुकर बाचुळकर
---------------
चंद्र, सुर्यग्रहण सुरु असताना कळशीच्या पाण्यात तुळस टाकतो. तशाच पद्धतीने दर्भही टाकले जाते. दर्भाचा प्रत्येक धार्मिक कार्यात वापर होतो. त्यामुळे सुवर्णापेक्षा दर्भाला अधिक महत्व आहे. नदीकाठी ते असले तरी ते ओळखण्याची खुण म्हणजे, दर्भाची काडी खालून वर गेले की, मऊ लागते; तर काडीला वरुन खाली हात फिरवला की ती उसाप्रमाणे खडबडीत लागते. हे गवत तयार झाले की, ते आणून वाळवून मौळी तयार करुन ठेवावी लागते.
- मुकुंद इंगळीकर, पुरोहित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.