उघडीपीने शेतकरी सैरभर

उघडीपीने शेतकरी सैरभर

Published on

उघडिपीने शेतकरी सैरभर
चिंता वाढली; पंचगंगेची पातळी तीन फुटांनी घटली

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : पाणलोट क्षेत्र वगळता जिल्ह्यात दोन दिवस पावसाने उघडीप दिली आहे. जून कोरडा, जुलैमध्ये एक दिवसच दमदार, अन्य दिवस कमी-अधिक अशा अस्थिर पावसामुळे चिंतेत भर पडली आहे. सध्या गगनबावडा तालुक्यातील कोदे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला एकमेव आहे. दुसरीकडे नदी काय ओढे, नाले आणि ओहळीही भरले नसल्याचे विदारक चित्र आहे. त्याचा पहिला फटका पेरणीसह पिकांना बसत आहे. त्याने शेतकरी सैरभैर आहेत. पावसाळ्यात दुथडी असे चित्र नित्य असणाऱ्या पंचगंगेत सोमवारी पाणी पातळी अवघी साडेअठरा फुटांपर्यंत होती. रविवारपेक्षा यात सुमारे तीन फुटांनी घट झाली आहे.
आठवड्यापूर्वी झालेल्या पेरण्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, हळदी, सरकारी कोगे असे नऊ बंधारे रविवारी पाण्याखाली होते. आज आठ बंधारे पाण्याखाली आहेत.
१३ ते १४ पासून जोर शक्य
राज्यात १३ ते १४ जुलैपासून कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा जोर धरेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जोरदार पावसाशिवाय सध्या पर्याय नाही. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १३ प्रकल्पांमध्ये ३५ ते ४० टक्केच पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज आहे.

धरण* क्षमता* आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
राधानगरी* ८.३६* ३.३६
तुळशी* ३.४७* ०.९४
वारणा* ३४.३९* १३.७८
दूधगंगा* २५.३९* ३.८१
कासारी* २.७७* ०.९३
कडवी* २.५१* १.००
कुंभी* २.७१* १.२८
पाटगाव* ३.७१* १.३७
चिकोत्रा* १.५२* ०.४४
चित्री* १.८८* ०.४१
जंगमहट्टी* १.२२* ०.३५
घटप्रभा* १.५६* १.५६
जांबरे* ०.८१* ०.४८
आंबेओहोळ* १.२४* ०.४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.