शासकीय तंत्रनिकेतनमध्ये साकारणार ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये साकारणार ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
साकारणार ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

इंजिनिअरिंग सिम्युलेशन, आयओटीवर होणार संशोधन; राज्य शासनाकडून साडेचार कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर, ता. १० ः उद्योग-व्यवसायाच्या वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन करण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यात दहा सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्र) उभारणाचा निर्णय घेतला आहे. त्यात कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे. या तंत्रनिकेतनमधील सेंटरसाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर झालेले शासकीय तंत्रनिकेतन हे राज्यातील एकमेव तंत्रनिकेतन आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), इंजिनिअरींग सिम्युलेशन, एरियल व्हेईकल अथवा ड्रोन लॅब या क्षेत्राताली अद्ययावत संशोधन या सेंटरच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी आवर्ती खर्चासाठी ८६ लाख रूपये, तर अनावर्ती खर्चाकरिता ३ कोटी ६४ लाख रूपयांचा निधी शासन देणार आहे. एनबीए मानांकन, उपलब्ध जागा, संस्था पातळीवरील सल्लागार समिती, आदी बाबी विचारात घेवून या सेंटरसाठी तंत्रनिकेतनला मंजुरी देण्यात आली आहे.
...
कोट
‘शासकीय तंत्रनिकेतनमधील या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मंजुरीत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तंत्रनिकेतन आणि उद्योग-व्यवसायक्षेत्रातील समन्वयवाढीसाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याठिकाणी संशोधन केले जाणार आहे.
-डॉ. रणजीत सावंत, मुख्य संशोधक, सेंटर ऑफ एक्सलन्स
...

राज्यात अन्य नऊ ठिकाणी होणार सेंटर

शिक्षण आणि उद्योगक्षेत्राचा समन्वय वाढविणे तसेच मनुष्यबळ, रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता संशोधन करण्यासाठी शासनाने या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनसह अन्य नऊ शासकीय, अशासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सेंटर स्थापन होणार आहे. त्यात सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ पुणे, व्ही. जे. टी. आय. मुंबई, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, कराड आणि अवसरी (पुणे) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयांचा समावेश आहे.
...

‘रिसर्च स्कॉलर’ला
३० हजार पाठ्यवेतन

या सेंटरमधील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी ३ ते ४ ‘रिसर्च स्कॉलर’ला संधी दिली जाणार आहे. त्यांना दरमहा ३० हजार रूपये इतके पाठ्यवेतन दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com