जिरगे निवड

जिरगे निवड

Published on

15240
डॉ. पद्मा जिरगे

‘आयएसएआर’च्या अध्यक्षपदी
डॉ. पद्मा जिरगे यांची निवड
कोल्हापूर, ता. १० ः प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची महाराष्ट्र चॅप्टरच्या ‘आयएसएआर’च्या (इंडियन सोसायटी ऑफ सोसायटी रिप्रोडक्शन) अध्यक्षपदी निवड केली. नागपूर येथे झालेल्या परिषदेत डॉ. जिरगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
या परिषदेत डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी वंध्यत्व क्षेत्रातील सध्याच्या व भविष्यातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. पुढील दोन वर्षे डॉ. जिरगे हा पदभार सांभाळतील. वंध्यत्व रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात त्या कार्य करणार आहेत. या दोन वर्षांत त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कार्यपद्धतीबद्दल त्यांनी माहिती दिली. पुढील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला आयव्हीएफ क्षेत्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी मार्गदर्शन करणार आसल्याचेही सांगितले.
डॉ. पद्मा जिरगे विविध संशोधन, तसेच प्रत्यक्ष रुग्ण उपचार याद्वारे समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत आहेत. वंध्यत्व उपचारांमध्ये त्यांचे संशोधन हे बहुमोल ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.