पीक विमा

पीक विमा

Published on

पीक विम्यासाठी एकच रुपया घ्यावा

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी : सेवा केंद्रांना सूचना

कोल्हापूर, ता. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी केवळ एक रुपयाचा भरावा लागणार आहे. जादा पैसे घेणाऱ्यांची तक्रार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, यावर्षीच्या खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ या ३ वर्षासाठी पिक विमा घेतला जात आहे. यासाठी केवळ एक रुपया घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार सामूहिक सेवा केंद्रधारकाने केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा योजनेचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधवा. २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम ४० रूपये देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्रधारकांकडून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी होत आहेत. त्यानुसार हे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.