सोहाळेत वांझ जनावरांचे शिबीर

सोहाळेत वांझ जनावरांचे शिबीर

Published on

ajr106.jpg

सोहाळे (ता. आजरा) येथे वांझ जनावरांच्या शिबिराचे उद्‍घाटनप्रसंगी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर व पदाधिकारी.
-----------------------
सोहाळेत वांझ जनावरांचे शिबिर
आजरा ः सोहाळे (ता. आजरा) येथे गोकुळतर्फे वांझ जनावरांचे शिबिर झाले. गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. श्रीमती रेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातील वांझ जनावरांची संख्या मोठी आहे. या जनावरांवर उपचार करून त्यांना पूर्ववत दुधाळ केल्यास गोकुळच्या दूध संकलनवाढीसाठी मोठा फायदा होईल. त्याचबरोबर दूध उत्पादकालाही फायदा होईल. तालुक्यातील सर्वच गावांत १० ऑगस्टपर्यंत वांझ जनावर उपचार कार्यक्रम घेण्यात येईल. डॉ. ज्ञानेश्वर लोंगणे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. पर्यवेक्षक दयानंद जाधव, वसंत देसाई, सदाशिव डेळेकर, अण्णासो पाटील, शिवाजी कोंडुसकर, चंद्रकांत देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.