स्वच्छतेबाबत हयगय केल्यास कारवाई

स्वच्छतेबाबत हयगय केल्यास कारवाई

Published on

इचलकरंजी महापालिका वापरणे
---------------------
स्वच्छतेबाबत हयगय केल्यास कारवाई
ओमप्रकाश दिवटे; इचलकरंजी महापालिका आरोग्य विभाग बैठक
इचलकरंजी, ता. १० ः शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत हयगय झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला. कार्यभार घेतल्यानंतर आज महापालिका सभागृहात आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी स्वच्छतेबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले.
आयुक्त दिवटे म्हणाले, ‘सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. सार्वजनिक स्वच्छतागृहांसह शौचालयाच्या ठिकाणी कटाक्षाने स्वच्छता कशी राहील, याबाबत खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. काही घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊ शकते. त्यामुळे सारण गटारींची स्वच्छता ही झालीच पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल, यावर चर्चा करुन त्याची कार्यवाही करावी.’
डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच भागात औषध फवारणीवर लक्ष केंद्रीत करा. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत स्वच्छतेचा प्रश्न आहे. त्यामुळे या कामात तत्परता असली पाहिजे. यामध्ये निष्काळजीपणा दाखवू नये. प्रत्येकांनी आपापली जबाबदारी गांभीर्यांने पार पाडावी, अशा सूचना देत आयुक्त दिवटे यांनी या कामात निष्काळजीपणा दाखवल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, चारही विभागीय कार्यालयाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, प्रभारी अधिकारी, मुकादम, स्वच्छता पर्यवेक्षक उपस्थित होते.
-----
प्लास्टीक वापराबाबत कारवाईच्या सूचना
बंदी घातलेल्या प्लास्टीकचा वापर सर्रास होताना दिसत आहे. आयुक्त दिवटे यांनी बैठकीत हा विषय गांभिर्याने घेतला आहे. याबाबत कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित वार्डातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.