चोरट्यास अटक

चोरट्यास अटक

Published on

चोरीतील मोबाईल हॅण्डसेट जप्त

रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक ःस्थानिक गुन्हे अऩ्वेषण शाखेची कारवाई

कोल्हापूर, ता. १० ः जबरी चोरीतून मिळालेला मोबाईल हॅण्डसेट विक्री करण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्‍या पोलिसांनी अटक केली. किसन उर्फ बोबडया उमाशंकर कुंभार (वय २७, रा. गांधीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शांतीप्रकाशनगर, झोपडपट्टी) असे त्याचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील पंचगंगा नदीवरील पुलाजवळील पीर वालेसाहेब बाबा दर्गा परिसरात आज ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, अंमलदार सुरेश पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार बोबडया कुंभार हा चोरीतील मोबाईल हॅण्डसेट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळ रचला. अंमलदार रामचंद्र कोळी, अमित सर्जे, सुरेश पाटील, सागर माने, संदीप गायकवाड यांच्या तपास पथकाने त्याला तब्यात घेवून अधिक चौकशी केली. तेंव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीस हजार रुपये किंमतीचा हॅण्डसेट जप्त केला. तो पोलिस रेकॉर्डवरील असून त्याच्यावर गांधीनगर, वडगाव, शाहूपुरी, तसेच संकेश्वर (कर्नाटक) पोलिस ठाणे येथे घरफोडी, मोबाईल चोरी असे एकूण २० गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.