जिल्ह्यात ‘क्लस्टर स्कूल’ नको

जिल्ह्यात ‘क्लस्टर स्कूल’ नको

Published on

जिल्ह्यात ‘क्लस्टर स्कूल’ नकोः आसगावकर

कोल्हापूर, ता. ११ : मुख्याध्यापकांची पदोन्नती, विषय शिक्षक, प्रज्ञा शोध परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण, आदी प्रश्नांवर प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने आज म्हणणे मांडले. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यात जिल्ह्यात क्लस्टर स्कूल सुरू करण्यास आमदार आसगावकर यांनी विरोध केला.
शासनाच्या २३ जून २०२३ च्या निर्णयाची अंमलबजावणी अजून दोन महिने करण्यात येवू नये. प्रज्ञाशोध परीक्षेच्या प्रमाणपत्र लवकर देण्यात यावे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष प्रमोद तोंदकर यांनी केली. त्यावर मुख्याध्यापकांची पदोन्नती लवकर केली जाईल. प्रज्ञाशोध परीक्षेची प्रमाणपत्र तत्काळ देण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, कृष्णात कारंडे, सुरेश कोळी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.