चंदगड मुख्याधिकारीपदी शील्पाराणी जाधव रुजू

चंदगड मुख्याधिकारीपदी शील्पाराणी जाधव रुजू

Published on

03060
चंदगड मुख्याधिकारीपदी
शील्पाराणी जाधव रुजू
चंदगड ः येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी शील्पाराणी जाधव रुजू झाल्या. नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी त्यांचे स्वागत केले. काही वर्षापासून येथे पूर्ण वेळ मुख्याधिकारीपद नव्हते. गडहिंग्लज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिरीक्त पदभार होता. नवीन मुख्याधिकारी नियुक्तीमुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. जाधव यांनी शहरातील विकासकामे तसेच प्रशासकीय कामकाजाला गती देणार असल्याचे स्पष्ट केले. नगरसेविका अनिता परीट, नेत्रदीपा कांबळे, नगरसेवक सचिन नेसरीकर, आनंद हळदणकर, प्रशासकीय अधिकारी आशुतोष प्रधान आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.