आजरा महाविद्यालयात लोकसंख्या दिन

आजरा महाविद्यालयात लोकसंख्या दिन

Published on

ajr113.jpg.....
आजरा ः येथील आजरा महाविद्यालयात कार्यक्रमात बोलतांना प्रा. तानाजी गायकवाड. या वेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ व अन्य.
-------------------
आजरा महाविद्यालयात लोकसंख्या दिन
आजराः भारतामध्ये वाढत्या लोकसंख्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. यासाठी लोकसंख्येचे नियमन करणे आवश्यक आहेच. पण लोकसंख्येचा वापर विधायक कामासाठी करणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. तानाजी गायकवाड यांनी केले. आजरा महाविद्यालयात भूगोल व अर्थशास्त्र विभागातर्फे जागतिक लोकसंख्या दिन झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. आजरा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दिलीप संपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. एम. आर. शिंदे, प्रा. शेखर शिउडकर, प्रा. बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. प्रा. अनिल निर्मळे यांनी स्वागत केले. डॉ. एस. के. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. बी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रत्नदीप पवार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.